Manasvi Choudhary
महिलांच्या शरीरात होणारे बदल अनेकदा समजत नाही. मात्र त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
पोटात दुखणे ही समस्या सामान्य असली तरी महिलांनी सावधान राहणे देखील गरजेचे आहे. केवळ प्रेग्नेन्सीतच नाही तर अनेक गंभीर आजारांमुळे महिलांच्या पोटात दुखू शकते.
मासिक पाळीची तारीख जवळ आली की महिलांच्या पोटात वेदना होऊ लागतात.
युरिन इन्फेक्शनच्या समस्येमध्ये महिलांच्या पोटात वेदना होऊ शकतात. मूत्राशयात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्याने ओटीपोटात दुखते.
PCOD मुळे महिलांच्या पोटात वेदना होतात. ओटीपोटाच्या एका बाजूला दुखते यामुळे तुम्हीच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.
महिलांचे गर्भाशय आणि आतडे हे शरीरात अगदी जवळ असतात. अनेकदा पोटात गॅस गोळा होणे, बद्धकोष्ठता यामुळे पोटात दुखते.