Manasvi Choudhary
किडनी हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी घटक बाहेर काढण्याचे कार्य किडनी करते.
किडनीचे कार्य योग्य होत नसेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
दैंनदिन जीवनातील अनेक चुकीच्या सवयी, चुकीचा आहार हे किडनीवर निकामी करण्यास कारणीभूत ठरतात.
आहारातील मिठाचे प्रमाण मर्यादित असणे महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात सोडियम खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो.
लघवीचा रंग हा गडद पिवळा असेल तर किडनीच्या समस्याचे सुरूवातीचे लक्षण समजले जाते. लघवीत फेससारखा थर दिसल्यास किडनी फिल्टरचे कार्य नीट होत नाही हे लक्षण दिसून येते.
शरीराच्या विविध अवयवात पाणी साचल्याने पाय, घोटे, हात आणि चेहऱ्यावर सूज येते.
वारंवार लघवीची समस्या असल्यास किडनीचा आजार असल्याची संकेत आहेत. रात्रीच्या वेळी लघवी होणे
शरीरातील रक्ताची कमतरता निर्माण होऊन सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास किडनी निकामी झाल्याचे संकेत मिळते.
रक्तातील फॉस्फरस आणि इतर टाकाऊ पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे किंवा सतत खाज सुटण्याच्या समस्या निर्माण होतात.