Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक अचानक येतो असं वाटत असलं तरी शरीर आधीच काही संकेत देत असतं. हे संकेत २४ ते ४८ तास आधीही दिसू शकतात आणि अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.
हार्ट अटॅक येण्याच्या आधी छातीत दडपण, जडपणा किंवा जळजळ जाणवू शकते. हा त्रास होतो आणि त्यांनंतर बंदही होतो. त्यामुळे अनेकजण त्याला गॅस किंवा अॅसिडिटी समजतात. मात्र हा रक्तपुरवठा होत नसल्याचं महत्त्वाचं लक्षणं असतं.
सामान्य काम करूनही खूप थकवा जाणवणं हे एक मोठं लक्षण आहे. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे ऊर्जा कमी होते. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसून येतं.
हलकी हालचाल करतानाही श्वास लागणं सुरू होऊ शकतं. हृदय व्यवस्थित पंपिंग करू शकत नसल्यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो. त्यामुळे अचानक दम लागणं हे गंभीर संकेत असू शकतात.
छातीव्यतिरिक्त हात, खांदा, मान, जबडा किंवा पाठीत वेदना होऊ शकतात. या वेदना सतत नसून येत-जात राहू शकतात. त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, पण हे हार्ट अटॅकचं क्लासिक लक्षण आहे.
काही लोकांना अॅसिडिटीसारखी लक्षणं दिसतात जसं मळमळ किंवा पोटात जळजळ. त्यामुळे अनेक वेळा हार्ट अटॅकचा अंदाज येत नाही. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त सामान्य आहे.
अचानक थंड घाम येणं किंवा हलकंसं चक्कर येणं हेही संकेत असू शकतात. रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे शरीराची प्रतिक्रिया बदलते. काही वेळा व्यक्तीची शुद्धही हरपू शकते.