Surabhi Jayashree Jagdish
हाडं मजबूत दिसत असली तरी ऑस्टिओपोरोसिस ही समस्या शांतपणे वाढत असते. त्यामुळे सुरुवातीला त्याची लक्षणं दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. मात्र काही सूक्ष्म बदल वेळेवर ओळखल्यास हाडांचं नुकसान टाळण्यासाठी योग्य उपचार घेता येऊ शकतात.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता (Bone Density) कमी होऊन हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात. या आजारामुळे अगदी किरकोळ धक्का किंवा पडल्यावरही हाडं मोडण्याचा धोका वाढतो. हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाही.
वारंवार नखं तुटणं किंवा दात कमकुवत वाटणं हे हाडांची घनता कमी होत असल्याचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. नखे, दात आणि हाडं यांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आणि कोलेजन महत्त्वाची भूमिका बजावतात.
वारंवार किंवा दीर्घकाळ पाठदुखी अथवा मानदुखी जाणवत असेल तर त्यामागे मणक्यांच्या हाडांची झीज किंवा फ्रॅक्चर असू शकतात. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्यांवरील दाब वाढून वेदना निर्माण होतात. अशा वेदना सतत राहिल्यास हाडांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
साध्या धक्क्याने किंवा किरकोळ पडल्यावर हाड मोडणं हे ऑस्टिओपोरोसिसचं महत्त्वाचं सुरुवातीचं लक्षण मानलं जातं. हाडांची अंतर्गत रचना कमकुवत झाल्यामुळे त्यांची सहनशक्ती कमी होते. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या फ्रॅक्चरकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार किंवा दीर्घकाळ पाठदुखी अथवा मानदुखी जाणवत असेल तर त्यामागे मणक्यांच्या हाडांची झीज किंवा फ्रॅक्चर असू शकतात. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्यांवरील दाब वाढून वेदना निर्माण होतात. अशा वेदना सतत राहिल्यास हाडांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
शरीर पुढे झुकल्यासारखं दिसणं किंवा पाठ कायम वाकलेली वाटणं हे मणक्यांच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकते. याला वैद्यकीय भाषेत कायफोसिस असं म्हणतात. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्यांवर दाब वाढत गेल्याने अशी शरीररचना तयार होऊ शकते.
एखादी वस्तू घट्ट पकडताना ताकद कमी झाल्याची जाणीव होणं हेही सुरुवातीचं संकेत असू शकतात. हाताची पकड कमी होणं हे हाडांच्या तसंच स्नायूंच्या ताकदीत घट होत असल्याचं मानलं जातं. अशी समस्या इतर लक्षणांसोबत दिसत असल्यास बोन डेन्सिटी तपासणी करून घेणं योग्य आहे.