Early Pregnancy Tips: गर्भधारणेच्या सुरुवातीला होतात हे ७ विकार, आत्ताच व्हा सावध

Sakshi Sunil Jadhav

शरीरातले बदल

प्रत्येक महिलेचं आई होण्याचं स्वप्न असतं. मात्र गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात शरीरात होणारे हार्मोनल आणि शारीरिक बदल योग्य वेळी लक्षात न घेतल्याने गुंतागुंत वाढू शकते.

first trimester risks

हार्मोनल असंतुलन

गर्भधारणेच्या सुरुवातीला प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सची योग्य पातळी आवश्यक असते. हार्मोनल असंतुलन झाल्यास भ्रूण रोपण (implantation) आणि विकासावर परिणाम होऊ शकतो.

pregnancy health problems

उच्च रक्तदाब

अनियंत्रित रक्तदाबामुळे प्लेसेंटाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे बाळाला ऑक्सिजन व पोषक घटक कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता असते.

pregnancy health problems

मधुमेह

पूर्वीपासून असलेला किंवा गर्भधारणेदरम्यान झालेला मधुमेह नियंत्रित नसल्यास गर्भाच्या सुरुवातीच्या विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. विशेषतः पहिल्या तिमाहीत धोका जास्त असतो.

pregnancy health problems

संसर्ग

विषाणू किंवा जिवाणू संसर्ग (विशेषतः पहिल्या तिमाहीत) उपचार न केल्यास गर्भाच्या वाढीवर गंभीर परिणाम करू शकतात. ताप, अंगदुखी, संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी आवश्यक.

pregnancy health problems

थायरॉईड विकार

थायरॉईड संप्रेरक चयापचय आणि गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड स्थितीमुळे गुंतागुंत वाढू शकते.

pregnancy health problems

तीव्र अॅनिमिया

हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास आईला अशक्तपणा जाणवतो आणि गर्भाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. आयर्न आणि फॉलिक अॅसिड पूरक आहार आवश्यक.

pregnancy health problems

जीवनशैलीतील चुकीच्या सवयी

धूम्रपान, मद्यपान, जंक फूडचे अति सेवन किंवा झोपेची कमतरता यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात धोका वाढतो.

pregnancy health problems

मानसिक तणाव

मानसिक ताणतणावामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. रिलॅक्सेशन, योग, ध्यान यांचा उपयोग होऊ शकतो.

pregnancy health problems

NEXT: Chanakya Niti: दु:खापासून लांब राहण्यासाठी काय केलं पाहिजे? चाणक्यांनी सांगतले सगळ्यात मोठं सत्य

Chanakya life lessons
येथे क्लिक करा