Menopause : महिलांमध्ये मेनोपॉजचं लवकर येण्याचे प्रमाण वाढलं, वेळेत जाणून घ्या'' ही' लक्षण

Alisha Khedekar

मेनोपॉज म्हणजे काय?

मेनोपॉज म्हणजे स्त्रीला सलग १२ महिने मासिक पाळी न येणे. या टप्प्यानंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसते आणि प्रजनन काळ समाप्त होतो.

What is menopause? | Saam Tv

वयाचा टप्पा

साधारणपणे मेनोपॉज ४५ ते ५५ वयोगटात येतो. काही महिलांमध्ये तो लवकर किंवा उशिरा येऊ शकतो.

Menopause age stage | Saam tv

लक्षणांची सुरुवात

मेनोपॉजच्या आधी काही वर्षे पेरिमेनोपॉज सुरू होते. या काळात मासिक पाळी अनियमित होते आणि शरीरात हार्मोनल बदल दिसू लागतात.

menopause symptoms | Saam Tv

पेरिमेनोपॉजची सुरुवातीची लक्षणे

अनियमित पाळी, रक्तस्रावात बदल, चेहरा लाल होणे आणि रात्री घाम येणे ही पेरिमेनोपॉजची सुरुवातीची प्रमुख लक्षणे मानली जातात.

Early symptoms of perimenopause | saam Tv

मानसिक परिणाम

मेनोपॉजमुळे नैराश्य, चिंता, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. स्मरणशक्तीवरही परिणाम जाणवू शकतो.

Psychological effects of menopause | Saam Tv

शारीरिक बदल

वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे आणि शरीरावर अनावश्यक केस वाढणे हे मेनोपॉजदरम्यान सामान्यपणे दिसणारे शारीरिक बदल आहेत.

Hair Fall due to menopause | Saam Tv

झोपेच्या समस्या

अनेक महिलांना मेनोपॉजदरम्यान झोप न लागणे किंवा रात्री वारंवार जाग येणे यासारख्या समस्या त्रासदायक ठरतात.

Sleep problems due to menopause | Saam tv

आरोग्यावर परिणाम

लैंगिक इच्छा कमी होणे आणि अस्वस्थता निर्माण होणे हे मेनोपॉजमुळे होणारे महत्त्वाचे बदल आहेत.

Loss of sexual desire due to menopause | Saam Tv

हाडे आणि सांधे

सांधे दुखणे किंवा आखडणे या समस्या वाढतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Bone and joint pain due to menopause | Saam tv

लक्षणांचा कालावधी

मेनोपॉजची लक्षणे अनेक वर्षे टिकू शकतात. काही महिलांना शेवटच्या पाळीनंतरही १०-१२ वर्षे विविध लक्षणांचा अनुभव येतो.

Duration of symptoms due to menopause | Saam tv

NEXT : मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?

Mungya Saral Ka Chaltat | google
Mungya Yene: मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?