Siddhi Hande
दसरा हा सण प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबात साजरा केला जातो.
दसरा हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या असतात.
दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू किंवा दागिने खरेदी करतात. यामुळे भरभराट होते असं म्हणतात.
दसऱ्याच्या दिवशी छान तयार होऊन देवाची पूजा करावी. देवीची आराधना करावी.
दसऱ्याला तुम्ही खास पैठणी साडीचा ड्रेस घालू शकतात. या ड्रेसमध्ये तुम्ही खुलून दिसाल.
पैठणी साडीचा तुम्ही लाँग ड्रेस शिवून घेऊ शकतात. त्यावर छान अॅम्बोडरीदेखील करु शकतात.
पैठणीचा को-ऑर्डसेटदेखील तुम्हाला खूप छान दिसेल. त्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळी डिझाइन ट्राय करा.
तुम्ही पैठणीचा घरारा पॅटर्नमधील ड्रेसदेखील घालू शकता. त्यावर छान मॅचिंग ज्वेलरी घातल्यावर अजूनच छान लूक येईल.
काठपदर साडीचा वनपीसदेखील तुम्ही घालू शकतात. यामुळे तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल.