Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दसरा या सणाला विशेष महत्व आहे.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात.
पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचं रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्रांची पूजा केली.
त्याचवेळी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली.