Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दसरा या सणाला विशेष महत्व आहे.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात.
यावर्षी दसरा हा २ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करावे आणि नवीन वस्त्र परिधान करा.
सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करावे. शस्त्राची मांडणी करून त्यावर हळद- कुंकू लावावे.
नंतर फुलं आणि शमीची पान अर्पण करा. शमीच्या पानाची पूजा करा.
नवरात्रीच्या नऊ दिवसांनी दशमी तिथीला यश देवो बोलून देवीचं स्मरण करून शस्त्रांची पूजा करावी.
विजयादशमीच्या दिवशी कालिका मातेची पूजा केली जाते.