Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन; सूर्या-देविशा झाले आई-बाबा

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यकुमार यादव

भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी आई-बाबा झाले आहेत. सूर्यकुमार यादवने नुकतेच भारतीय संघाला २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवून दिला.

Devisha Shetty

सूर्याला कन्यारत्न

सध्या आयपीएल सुरु असून सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळतो. सूर्याची पत्नी देविशा हिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.

Baby girl news

पुढचा सामना खेळणार का?

मैदानावर त्याच्या ३६०-डिग्री शॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्टार खेळाडूच्या घरी आता एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. तो मुंबई इंडियन्सच्या पुढील आयपीएल सामन्यात खेळणार का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Indian cricket team

2016 मध्ये अडकले लग्नबंधनात

सूर्यकुमार यादवने २०१६ मध्ये देविशा शेट्टीशी लग्न केलं होतं. मूळचा मुंबईचा असलेला सूर्यकुमारचं शिक्षण शहरातच झालं. याठिकाणी त्याची भेट देविशाशी झाली.T20 World Cup

Mumbai Indians

कॉलेजमधील लव्हस्टोरी

सूर्या आणि देविशा यांची लव्हस्टोरी कॉलेजमध्ये सुरु झाली होती. देविशा शेट्टीला तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये डान्सची खूप आवड होती. कॉलेजमधील एका कार्यक्रमादरम्यान सूर्य तिच्या प्रेमात पडला. येथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली.

T20 World Cup

डोहाळेजेवणाचे फोटो

या वर्षी मार्च महिन्यात देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये सूर्या आणि देविशा एका हॉलमध्ये एन्ट्री घेत होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सूर्याची पत्नी गरोदर असल्याचं समजलं.

Cricket captain

सूर्याचा फॉर्म चिंताजनक

सध्या मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी सूर्याचा फॉर्म हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्याला चांगला खेळ करता आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव टीमसोबत रायपूरला गेलेला नाही.

Indian cricketer

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा