Shruti Vilas Kadam
ओढणीला एक खांद्यावर पिन करून सोडलेला स्टाइल. हा साधा, सोयीस्कर आणि पारंपरिक दिसतो.
ओढणीला दोन्ही खांद्यावर पिन करून, समोर व्ही-आकारात ड्रेप करा. यामुळे गळ्याची रचना खुलते आणि लुक अधिक आकर्षक होतो.
ओढणीचा पल्लू उजव्या खांद्यावरून घेऊन डाव्या बाजूस पसरवा. हा स्टाइल गरबा, पारंपरिक कार्यक्रमांसाठी आदर्श आहे.
ओढणीला शॉलसारखा पाठीवर ओढून, दोन्ही टोक समोर आणून पिन करा. हा फ्यूजन आणि इंडो-वेस्टर्न लुकसाठी उपयुक्त आहे.
ओढणी व्यवस्थित ठेवण्यासाठी चांगल्या पिन्सचा वापर करा. यामुळे ओढणी सारखी सरकणार नाही.
ओढणीचा फॅब्रिक निवडताना त्याच्या वजनाचा विचार करा. हलका फॅब्रिक असल्यास साइड पल्लू किंवा केप स्टाइल योग्य राहील.
ओढणी ड्रेप करताना ब्लाउजचा डिझाइन लपवू नका. ओव्हर ड्रेपिंग टाळा, ज्यामुळे ब्लाउजचा डिझाइन दिसून येईल.