Shreya Maskar
दुधी हलवा बनवण्यासाठी किसलेला दुधी भोपळा, साखर, किसलेला खोबरे, तूप, दूध, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
दुधी हलवा बनवण्याची सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले दुधी भोपळा घालून चांगले परतून घ्या.
दुधीचा सर्व कच्चेपणा घालवा.
दुधी भोपळा मऊ झाल्यावर त्यात खोबरं आणि साखर घालून ढवळून घ्या.
आता त्यात दूध आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
१० मिनिटांनी गॅस बंद करा.
शेवटी ड्रायफ्रूट्सने दुधी हलवा सजवा.
दुधी हलव्याची चव आणखीन वाढवण्यासाठी तो फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खा.