Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून दुधी हलवा बनवा. ही रेसिपी तुम्ही फक्त १०-१५ मिनिटांत बनवाल.
दुधी हलवा बनवण्यासाठी दुधी, साखर, दूध, तूप, सुकामेवा, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात खवा देखील टाकू शकता.
दुधी हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी चांगला स्वच्छ धुवून सालं सोलून घ्या. त्यानंतर चांगला किसून घ्या. दुधी किसल्यावर थोडा वेळ पाण्यात ठेवा. म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही.
पॅनमध्ये तूप टाकून त्यात सुकामेवा परतून घ्या. तुमच्या आवडीचे काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे चांगले तुपात तळा.
त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून किसलेला दुधी परतून घ्या. दुधी खमंग परतल्यावर त्यात कपभर दूध घालून सतत ढवळत राहा.
आता यात साखर घाला. सगळे छान घट्ट झाल्यावर त्यामध्ये थोडे अजून दूध मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
त्यानंतर यात बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घाला. तसेच वेलची पूड मिक्स करा आणि पटकन गॅस बंद करा.
गॅस मध्यम आचेवर ठेवून दुधी हलवा १० मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर हलवा तुम्हाला थंड खायचा असेल तर फ्रिजमध्ये ठेवून द्या.