Ruchika Jadhav
मंचूरिअन सर्वांनाच आवडतात. त्यामुळे घरच्याघरी मंचूरिअन कसे बनवायचे याची रेसिपी आज जाणून घेणार आहोत.
यासाठी सर्वात आधी कोबी मस्त बारीक चिरून घ्या.
कोबी बारीक चिरल्यानंतर यात मैदा आणि कॉर्नफॉवलचे पीठ मिक्स करा. यात चविनुसार मीठ सुद्धा घ्या.
यामध्ये चवीसाठी तुम्ही अद्रक-लसूणची पेस्ट सुद्धा मिक्स करू शकता.
मंचूरिअनला चांगली चव यावी यासाठी तुम्ही यामध्ये सोया आणि चिली सॉस सुद्धा मिक्स करू शकता.
तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सुद्धा यामध्ये तुम्ही किसून टाकाव्यात.
तयार मिश्रण आर्धा तास सेट झाल्यावर डीप तेलात मस्त फ्राय करून घ्या.