Manasvi Choudhary
ओठ कोरडे पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त झाले आहेत. वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ओठांची कोरडे होण्याची समस्या वाढत चालली आहे.
ओठांनी केमिकलयुक्त उत्पादने, लिपस्टिक वापरल्यामुळे देखील त्रास होत आहे.
कोरड्या ओठांची काळजी घेण्यासाठी आजपासूनच काही सवयी बदलायच्या आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी ओठ स्वच्छ करा आणि नारळाचे तेल लावा. नारळाचे तेल लावल्याने ओठांमध्ये मऊपणा राहील.
कोरड्या ओठांना तूप लावल्याने देखील तुम्हाला ओठ नरम झाल्याचा फरक दिसून येईल.
कोरफडमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ओठांना कोरफड रस लावा.
पेट्रोलियम जेल, कोको बटर असे केमिकल नसलेले उत्पादने ओठांना लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.