Siddhi Hande
प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असते. तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला की तुमचे आरोग्य सृदृढ राहिल.
तुम्ही घरी ड्रायफ्रुट्सचे पौष्टिक लाडू बनवू शकतात. हे लाडू चविष्ट असतात. त्याचसोबत आरोग्यासाठी उत्तमदेखील असतात.
लाडू बनवण्यासाठी तुम्हाला बदाम, काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मखाणा, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया हे पदार्थ आवश्यक आहेत.
सर्वात आधी तुम्ही काजू बदाम, पिस्ता, मखाणा, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढा.
यानंतर एकेक ड्रायफ्रुट्स मंद आचेवर भाजून घ्या.
यानंतर कढईत तूप टाका. त्यात खजूर भाजून घ्या.
यानंतर सर्व ड्रायफ्रुट्स थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
यानंतर खजूर मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात ड्रायफ्रुट्सची पावडर मिक्स करा.
यानंतर लाडू वळून घ्या. खजूराच्या चिकटपणामुळे तुमचे लाडू छान वळले जातील.