ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ड्रायफ्रुट्स हे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषण तत्वे असतात म्हणून ड्रायफ्रुट्स खाल्याने शरिर कमजोर पडत नाही.
जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाऊन कंटाळा असाल तर, आता ड्रायफ्रुट्स हलवा खाऊन बघा.
ड्रायफ्रुट्सने भरलेला शुध्द तूपातला हलवा खाल्यास तुम्हाला अशक्तपणा येणार नाही. हा हलवा टेस्टी लागतो आणि सगळे आवडीने तो खातात.
हा हलवा बनवण्यास खूप सोपा आहे. यासाठी तुम्हाला वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, तूप, दूध आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी, बदाम, काजू, मखाना, मनुका, खजूर आणि शेंगदाणे घ्या. खजूरातील बिया काढून टाका.
सगळ्या ड्रायफ्रुट्सला एकत्र मिळून मिक्सरमध्ये ग्राइंड करुन घ्या. सगळे साहित्य एकसमान वाटून घ्या.
एका मोठी कढई घ्या. त्यात तूप टाका आणि बारिक केलेला मेवा तूपात टाकून खरपूस परतवून घ्या.
परतवून झाल्यानंतर मेवामध्ये दूध आणि साखर टाका आणि मिक्स करुन घ्या. हलवा थोडा ओलसर ठेवावा.
२ ते ३ मिनिटे हलवा कढईत नीट शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा.
ड्रायफ्रुट्सचा हलवा तयार आहे. हा हलवा पौष्टिक असून शरिरासाठी फायदेशीर आहे. टेस्टी हलवा खाण्याचा तुम्ही आनंद घ्या.