Shruti Vilas Kadam
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, खजूर, अंजीर आणि थोडे तूप घ्या.
सर्व सुके मेवे हलक्या आचेवर तूप न घालता थोडेसे भाजून घ्या.
भाजलेले ड्राय फ्रूट मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
खजूर व अंजीर बारीक चिरून पॅनमध्ये गरम करून मऊ करा.
वाटलेले ड्राय फ्रूट खजूर-अंजीरमध्ये मिसळा.
चव आणि सुगंधासाठी थोडे तूप व वेलची पूड घाला.
मिश्रण थंड झाल्यावर हाताला तूप लावून लाडू वळा.