Dry Fruit Barfi Recipe: सण किंवा खास प्रसंगासाठी घरीच बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्राय फ्रूट बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

1 कप बदाम, 1 कप काजू, ½ कप पिस्ते, ½ कप अक्रोड, 8-10 खजूर (बिया काढलेले), 2-3 टेबलस्पून तूप, ½ टीस्पून वेलची पूड आणि सजावटीसाठी चिरलेले ड्रायफ्रूट.

Dry Fruit Barfi Recipe

ड्रायफ्रूट भाजून घ्या

बदाम, काजू, पिस्ते आणि अक्रोड मंद आचेवर 3-4 मिनिटे हलके भाजून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याची जाडसर पूड करून घ्या.

Dry Fruit Barfi Recipe

खजुराची पेस्ट तयार करा

खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. खजूर नैसर्गिक गोडवा देतात, त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज पडत नाही.

Dry Fruit Barfi Recipe

मिश्रण एकजीव करा

कढईत तूप गरम करून त्यात खजुराची पेस्ट परता. त्यानंतर ड्रायफ्रूटची पूड आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत हलवा.

Dry Fruit Barfi Recipe

बर्फीला आकार द्या

तुपाचा हलका हात लावलेल्या ट्रे किंवा ताटात हे मिश्रण पसरवा. वरून चिरलेले पिस्ते किंवा बदाम घालून हलके दाबा.

Dry Fruit Barfi Recipe

सेट होऊ द्या

मिश्रण 1 ते 2 तास थंड होऊ द्या किंवा 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड आकारात कापा.

Dry Fruit Barfi Recipe

पौष्टिक आणि चविष्ट मिठाई तयार

प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि फायबरने भरपूर असलेली ही ड्राय फ्रूट बर्फी सण-उत्सव, पाहुणचार किंवा मुलांच्या डब्यासाठीही उत्तम पर्याय ठरते. योग्य डब्यात भरून 8 ते 10 दिवस सहज साठवून ठेवता येते.

Dry Fruit Barfi Recipe

Eye Care: सुजलेले डोळे आणि थकवा मिनिटांत पळवा! हा सोपा घरगुती उपाय एकदा ट्राय कराच

Eye Care | Saam Tv
येथे क्लिक करा