Shreya Maskar
शेवग्याच्या शेंगाचे सूप बनण्यासाठी शेवग्याच्या शेंगा, मीठ, हळद, जिरे, हिंग आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
शेवग्याच्या शेंगाचे सूप बनण्यासाठी सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्यांच्यावरील साल काढून घ्या.
आता शेवग्याच्या शेंगा मीठ घालून पाण्यात उकडून घ्या.
शेंगा थंड झाल्यानंतर त्यातील गर काढून घ्या.
उरलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं थोड पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्या.
आता हे मिश्रण चाळणीच्या सहाय्याने गाळून त्यातील पाणी वेगळे करा.
मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, जिरे भाजून घ्या.
शेवटी यात हळद, कढीपत्ता, शेंगांचा रस, शेंगांचा गर , मीठ, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून उकळी काढून घ्या.