Shreya Maskar
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी शेवग्याच्या पानांचा चहा प्या.
शेवग्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी वाळलेली शेवग्याची पाने घ्या.
शेवग्याच्या पानांसोबत पाणी, मध आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.
शेवग्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात वाळलेली शेवग्याची पाने उकळवून घ्या.
यात चवीसाठी मध, लिंबू घालून मिक्स करा.
तुम्ही यात वेलची आणि दालचिनी देखील टाकू शकता.
शेवग्याच्या पानांचा चहा हा आरोग्यवर्धक असतो.
पावसाळ्यात दिवसातून १ वेळा शेवग्याच्या पानांचा चहा प्या.