Shreya Maskar
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र ही सवय आरोग्यास घातक ठरते गरम चहा प्यायल्यानंतर थंड पाणी प्यायल्यावर गंभीर समस्या उद्भवतात.
गरम चहानंतर अतिथंड पाणी प्यायल्यास संवेदनशील दातांमध्ये वेदना सुरु होतात. कोणताही पदार्थ खाताना त्रास होतो.
चहा आणि पाणी लगेच घेतल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि अस्वस्थता जाणवते. यामुळे पचन बिघडते.
अतिशय गरम चहामुळे घशात जळजळ होते आणि त्यावर थंड पाणी प्यायल्यावर समस्या आणखी वाढते.
एकाच वेळी पोटात गरम आणि थंड पदार्थांचे मिश्रण गेल्यामुळे ॲसिडीटीची समस्या उद्भवते. पोट फुगणे, गॅस होणे किंवा ॲसिड रिफ्लक्स याचा त्रास होतो.
गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने संवेदनशील तोंडाच्या ऊतींना त्रास होऊ शकतो. दातांची झीज, हिरड्या मागे जाणे किंवा दातांवरील संरक्षक आवरणाचे नुकसान होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा प्यायल्यानंतर १५ - ३० मिनिटांनी पाणी प्यावे. तसेच अतिथंड पाणी पिणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.