Manasvi Choudhary
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याची सवय अनेकांना असते. कोमट दूध प्यायल्याने शांत आणि गाढ झोप लागते, असा अनेकांचा समज आहे. परंतु, खरंच रात्री दूध प्यायल्याने झोप सुधारते का ते जाणून घ्या.
दूध हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. दुधामध्ये 'ट्रिप्टोफॅन' असते ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे कोमट दूध प्यायल्याने शरीराचा थकवा कमी होऊन झोप सुधारण्यास मदत होते.
रात्री दूध पिणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते असं नाही. काहींना रात्री दूध प्यायल्याने ॲलर्जी, गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
दुधामध्ये 'लॅक्टोज' असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी दूध प्यायल्याने पचनक्रियेवर ताण येऊ शकतो आणि झोप बिघडू शकते.
रात्री तुम्ही किती प्रमाणात दूध पिता हे देखील महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी जास्त दूध प्यायल्यास पोटात जडपणा येऊ शकतो आणि रात्री वारंवार लघवीला उठावे लागू शकते यामुळे झोपमोड होऊ शकते.
दररोज रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ एकसमान ठेवा.
झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे बंद करा.
रात्रीच्या वेळी चहा आणि कॉफी पिणे कटाक्षाने टाळा.
रात्रीच्या जेवणात नेहमी हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.