Shruti Vilas Kadam
रात्री झोपण्याआधी कोमट दूध प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामुळे मन शांत राहण्यास आणि झोप चांगली लागण्यास मदत होऊ शकते.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला आजारांशी लढण्यास आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते.
सर्दी किंवा खोकला झाल्यावर घशात खवखव जाणवत असेल तर कोमट हळदीचे दूध प्यायल्याने आराम मिळू शकतो.
रात्री कोमट हळदीचे दूध प्यायल्याने काही लोकांना आराम मिळू शकतो. मात्र, दूध प्यायल्याने गॅस किंवा पोट फुगत असेल तर ते पिणे टाळावे.
हळदीमध्ये सूज कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी आणि शरीरातील सूज कमी होण्यास काही प्रमाणात मदत मिळू शकते.
दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत होते.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.