Manasvi Choudhary
दिवसाची सुरूवात अनेकजण चहा पिऊन करतात.
तर अनेकांना सतत चहा प्यायची सवय असते. काही झालं की चहा पितात.
मात्र तुम्ही दिवसातून जास्त वेळा चहा पित असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते यामुळे झोपेवर परिणाम होतो.
चहामध्ये असलेले टॅनिन्स आणि कॅफिन हे पचनक्रियेवर परिणाम करतात.
उपाशीपोटी चहा प्यायल्यास छातीत मळमळ, पोट फुगणे अश्या समस्या उद्भवतात.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने चहातील कॅफिन या घटकामुळे चिंता, धडधड वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.