ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण दररोज एक कप तरी चहा पितोच. पण तो शरीरासाठी किती धोकादायक आहे, याबाबत आपल्याला सांगितलं जातं.
चहा शरिरासाठी घातक असल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी खोडून टाकलाय. उलट चहा प्यायल्याने फायदाच होत असल्याचं त्यांच्या संशोधनातून समोर आलेय.
चहामध्ये कॅलशियम, मॅगनीज आणि फ्लोराईड खनिजांचे प्रमाण जास्त असतं. त्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चहामुळे शरीरात कॅलशियम मिळते, त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. चहामुळे काही आजारापासून लांब राहायला मदत होते.
अमेरिकेच्या संशोधकांनी चहावर रिसर्च केलाय. जे लोक नेहमी चहा पितात, त्यांना ह्रदयविकाराचा धोका कमी असतो, असे संशोधनातून समोर आलेय.
तुम्ही सात वर्षांहून अधिक काळ नियमित दोन कप चहा पित असाल तर तु्म्हाला ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात असते.
आपल्याकडे चहा जास्त प्रमाणात उकळून पितात, पण ही पद्धत चुकीची आहे. चहा जास्त उकळल्याने त्यातली पोषक घटक नष्ट होतात.
चहा कोमट पाण्यात उकळू शकतो. साखर आणि दुधाचा वापर शक्यतो वापर टाळावा. त्याने कॅलरिज वाढतात आणि कोलेस्ट्रेरॉल वाढू शकतं. त्यामुळे त्याचं प्रमाण कमीच असावे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.