Manasvi Choudhary
ड्रायफ्रुट्समधील मनुका आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचा आहे.
मनुके विविध पदार्थामध्ये वापरले जाते. मनुका केवळ जेवणाची चवच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
सकाळी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
रात्री झोपण्यापूर्वी मनुके भिजत घालून सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यावे.
मनुका पाणी डिटॉक्सिफायरसारखे काम करते यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
नियमितपणे मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची पातळी राखण्यास मदत होते.
रिकाम्यापोटी मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते व दिवसभर थकवा देखील येत नाही.
मनुक्याचे पाणी पोटासाठी अत्यंत चांगले आहे. बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी या समस्या दूर होतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.