ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरम पाणी प्यायल्याने वजन कमी आणि खराब घसा बरा होण्यास मदत होते. परंतु गरजेपेक्षा अधिक प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास काही गंभीर समस्याही होऊ शकतात.
जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास तोंड घसा आणि पेाटातल्या नाजूक पेशींना नुकसान पोहचते.
अधिक प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास पोटातील उष्णता वाढून भविष्यात पोटाच्या विकाराची समस्या होऊ शकते.
नेहमी गरम पाणी प्यायल्यास तहान कमी लागते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
दररोज प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्यास शरीराच्या तापमानात बदल होऊन थकवा आणि चक्कर येणे यारखे समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही रोज गरम पाणी पित असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
अधिक प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास किडनीला अडथळा येतो. त्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.
गरम पाणीमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात 'या' रक्तगटाच्या लोकांना चावतात डास, यात तुमचा रक्तगट तर नाही ना?