ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दालचिनी केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे.
दालचिनीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया हे फायदे कोणते आहेत.
दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे टाइप २ मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दालचिनीचे पाणी प्यायल्याने मेटाबॅालिजम रेट वाढतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
शरीरातील खराब कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. यामुळे हृदयाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.
दालचिनीचे पाणी प्यायल्यास अपचन, गॅस, पोट दुखणे यासारखी समस्येपासून आराम मिळतो.
दालचिनीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासांरख्या आजारांचा धोका कमी होतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी दालचिनी उत्तम आहे. दालचिनीचे पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील दाग, मुरुम कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात केळी खाणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या