Chetan Bodke
आपण नेहमीच जेवणाची चव वाढावी, यासाठी अनेक गरम मसाल्यांचा आपण वापर करतो.
त्यातीलच एक पदार्थ म्हणजे, वेलची. वेलची जितकी चवीसाठी ओळखली जाते, त्यापेक्षा ती जास्त शरीरासाठी उपयुक्त असते.
नियमीत सकाळी रिकाम्या पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक आजार दुर होऊ शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळेल.
रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडते.
वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, वेलची रक्तदाब पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोत्तम परिणाम देऊ शकते.
जर तोंडातून घाणेरडा वास येत असल्यास आणि त्वचेसाठी वेलची फायदेशीर मानली जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.