Chetan Bodke
आज 'जागतिक महिला दिन' पण तुम्हाला या दिवसाचं कारण माहितीये का ?
या दिवसाची केव्हापासून सुरूवात झाली, कशी झाली, जाणून घेऊया...
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योग काम करणाऱ्या अनेक महिला कामगार एकत्र येत त्यांनी रुटगर्स चौकात प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.
कामाचे तास कमी व्हावे, पगारवाढ, मतदानाचा अधिकार यांसह अनेक मागण्यांसाठी महिलांनी ऐतिहासिक निदर्शने केली होती.
१९०८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक निदर्शनाच्या एका वर्षानंतर ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' साजरा करण्याचा ठराव पास झाला.
१९१० या वर्षी झालेल्या कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत हा ठराव क्लारा यांनी मंजुर करून घेतला होता.
भारतामध्ये महिला दिन १९४३ पासून साजरा केला जात आहे, तर १९७५ मध्ये युनोने 'जागतिक महिला दिन' म्हणून घोषणा केली होती.
दरवर्षी महिला दिन वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जातो.
२०२४ यावर्षी इन्स्पायर इन्क्लूजन या थीमच्या आधारे महिला दिन साजरा केला जाणार आहे.