Liver Health: लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढेल हा लाल रंगाचा ज्यूस, सकाळी उपाशीपोटी नक्की प्या

Surabhi Jayashree Jagdish

यकृताचं महत्त्व

यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो दिवसरात्र रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करतो. तसंच औषधांचं मेटाबॉलिझम आणि फॅट्स तोडण्याचं कार्यही करतो.

Healthy Liver | saam tv

आजच्या जीवनशैलीचा परिणाम

आजकाल चुकीचा आहार आणि अनहेल्दी जीवनशैलीचा लिव्हरवर मोठा परिणाम होतो. यामुळे लिव्हर हळूहळू कमजोर होऊ लागतं. वेळीच काळजी न घेतल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Detox Drinks | saam tv

बीटचा रस

बीटचा रस लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतो. तो लिव्हरला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया तो सुधारतो.

Liver Function | saam tv

अँटिऑक्सिडंट्सचा प्रभाव

बीटमध्ये बेटालेन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे फ्री रॅडिकल्स नष्ट करून लिव्हरच्या पेशींचे संरक्षण करतात. त्यामुळे लिव्हरला स्वतःची दुरुस्ती करणं सोपं होतं.

Healthy Lifestyle | saam tv

सूज कमी करण्यास मदत

लिव्हरमध्ये होणारी दीर्घकालीन सूज अनेक आजारांचं कारण ठरतं. बीटचं अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म ही सूज कमी करतात. त्यामुळे लिव्हर एन्झाइम्स संतुलित राहतात आणि नुकसान टळतं.

Beetroot Benefits | saam tv

फॅट मेटाबॉलिझम

बीटमधील बेटेन आणि फायबर फॅट तोडण्यास मदत करतात. यामुळे लिव्हरमध्ये चरबी साचण्यापासून बचाव होतो. तसंच पित्त निर्मिती योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

Lemon Juice | saam tv

कसा बनवाल रस?

एक बीट, एक काकडी आणि एक लिंबू घेऊन रस तयार करा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी पिणं फायदेशीर आहे. संशोधनानुसार हा रस लिव्हर डिटॉक्स प्रक्रियेला अधिक एक्टिव्ह करतो.

Body Detox | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

High Cholesterol | saam tv
येथे क्लिक करा