ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करता.
परंतु पावसाळ्यात वातावर्णात आद्रता जास्त असल्यामुळे केस ड्राय होतात आणि केस गळतीची समस्या उद्भवते.
काही घरगुती ज्यूस प्यायल्यामुळे तुमची केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.
गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन आणि बायोटिन असते, ज्यामुळे केस गळतीची समस्या कमी होते.
आवळ्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे शरीरामदील कोलेजन वाढवण्यास मदत होते.
कारल्याचा ज्यूस चवीला कडू असला तरी त्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतात भरपूर प्रमाणात आढळते.
कोरफडमधील एन्झाईम्स टाळूच्या मृत पेशी काढून टाकते आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.