Surabhi Jayashree Jagdish
आजच्या बदलत्या जीवनशैलीत वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनहेल्दी डाएट आणि खराब लाइफस्टाइल ही वजन वाढण्यामागची कारणं सांगितली जातात. त्यामुळे आहारासोबतच आपल्या दैनंदिन जीवनशैलीकडेही लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
वजन कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य आहाराच्या मदतीने वजन बऱ्याच अंशी कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. यासाठी दिवसाची सुरुवात ताज्या भाज्यांच्या ज्यूसने करण्याचा पर्याय निवडू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी ताज्या भाज्यांचा ज्यूस घेता येतो. भाज्यांचा जूस कमी कॅलरीजचा असून त्यात पोषक घटकही असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अशा ज्यूसचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं तर आवळा व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो. पालक आणि आवळ्याचा जूस मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतो. हा जूस घेतल्यानंतर बराच वेळ भूक न लागल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात मदत होऊ शकते.
टोमॅटोमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असून त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. टोमॅटोचा ज्यूस इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो. यासोबतच बेली फॅट कमी करण्यासाठीही हा ज्यूस उपयुक्त ठरतो.
दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असून त्यात कॅलरीज कमी असतात. सकाळी दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
कारल्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात. हे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर कारल्याचा ज्यूस मेटाबॉलिझम बूस्ट करण्यास मदत करतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याचा ज्यूसही आहारात घेता येतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.