Dhanshri Shintre
गाजर-आल्याचा रस अनेक भाज्या आणि मसाल्यांसारखा आरोग्यास उपयुक्त असून शरीर तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतो.
दररोज गाजर-आल्याचा रस प्यायल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात, ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत.
आल्यात व्हिटॅमिन-सी, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन-सी, के, फायबर आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.
दररोजच्या आहारात गाजर-आल्याचा रस घेतल्यास हाडे मजबूत होतात, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, व्हिटॅमिन-सीने भरपूर गाजर-आल्याचा रस पिणे फायदेशीर ठरते.
सध्या अनेकांना हृदयरोगाचा धोका आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी गाजर-आल्याचा रस पिणे उपयुक्त ठरते.
डिजिटल युगात डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन-एयुक्त गाजर-आल्याचा रस डोळ्यांसाठी उत्तम मानला जातो.