Dhanshri Shintre
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून अनेकजण लिंबू सरबत प्राधान्याने आहारात समाविष्ट करतात.
लिंबू हे व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असून, याच्या सेवनामुळे त्वचा निरोगी व चमकदार राहण्यास मदत होते.
सुकलेली, काळसर लिंबं फेकून न देता त्याचा वापर घरगुती आणि उपयुक्त कामांमध्ये सहज करता येतो.
सुकलेली लिंबं गरम पाण्यात भिजवल्यास ती मऊ होतात आणि पुन्हा त्यातून थोडाफार रस काढता येतो.
लिंबू मऊ झाल्यानंतर त्याचा गर चेहऱ्यावर लावून नैसर्गिक फेसवॉशसारखा वापरता येतो, विशेषतः तेलकट त्वचेसाठी हा घरगुती उपाय लाभदायक आहे.
लिंबू सरळ हातात घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवल्यास त्वचेवरील तेल कमी होतो आणि चेहरा उजळ, तजेलदार दिसतो.
सुकलेले लिंबं पाण्यात उकळून तयार केलेली हर्बल टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, विशेषतः वजन कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय उपयुक्त आहे.
लिंब पाण्यात भिजवून त्यात सोडा व डिशवॉश लिक्विड मिसळा. हे नैसर्गिक क्लीनर स्प्रे घराच्या साफसफाईसाठी अत्यंत प्रभावी ठरते.