Shruti Vilas Kadam
खारीकमध्ये नैसर्गिक साखर व कॅलरीज जास्त असल्यामुळे थंडीत शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी ती उत्तम आहे.
खारीकमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गांपासून संरक्षण मिळते.
खारीक कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियमने भरलेली असते. त्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते.
यातील फायबर पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलके राहते.
खारीक आयर्नने समृद्ध असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. अॅनिमिया टाळण्यासाठीही ती फायदेशीर आहे.
खारीक शरीरात उष्णता निर्माण करते. त्यामुळे थंडीत हात-पाय थंड पडणे आणि थकवा जाणवणे कमी होते.
खारीकमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारतात. केस गळणे, कोरडेपणा आणि त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो.