ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही वस्तू जास्त काळ टिकण्यासाठी आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु काही वस्तु चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका.
मध फ्रीजमध्ये ठेवल्याने ते घट्ट होते, यामुळे त्याचे गुणधर्म बदलू शकतात.
बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे साखरेचे रुपांतर होते.
केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होऊ शकतात.
काकडी फ्रीजमध्ये ठेवल्याने नरम होते आणि चवही बदलते.
कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती ओलावा शोषून घेऊ शकते आणि तिची चव खराब करु शकते.
टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते नरम होतात आणि त्यांची चव खराब होऊ शकते.