Dhanshri Shintre
दिवसातून लघवीची वारंवारिता, रंग, वास आणि वेदना याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे, दुर्लक्ष करू नका.
लघवी करताना तीव्र वेदना किंवा रंगात अचानक बदल जाणवले तर त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
लघवीमधून अनेकदा शरीरात गंभीर आजार निर्माण होण्याचे लक्षण समोर येते, त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
गडद तपकिरी, लाल, गुलाबी, नारंगी, हिरवा रंगाची लघवी असामान्य असून ती शरीरात गंभीर आजारांची सुरुवात दर्शवणारी चेतावणी असू शकते.
जास्त बिलीरुबिन किंवा व्हायरल हेपेटायटीसामुळे सिरोसिस होऊन मूत्राचा रंग गडद तपकिरी रंगाचा दिसू शकतो.
लाल किंवा गुलाबी लघवी मूत्रपिंड दुखापती, गंभीर आजार किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) दर्शवणारे लक्षण असते.
दुधाळ लघवी अनेकदा आजार, श्लेष्मा, पांढऱ्या रक्तपेशी किंवा स्फटिकांच्या उपस्थितीचे संकेत देते.
लघवी टिकणे, रात्री उठून लघवी करणे किंवा वारंवार लघवी येणे मूत्रपिंड संसर्ग किंवा न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.