Manasvi Choudhary
अनेकांना पोटदुखीचा त्रास असतो. पोटदुखी ही समस्या सामान्य वाटत असली तरी मात्र वारंवार पोटदुखी सुरू असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
एखाद्याला वारंवार जर पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे शरीराच्या किडनीच्या समस्येशी जोडले जाऊ शकते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास असतो त्यामुळे जर पोटात जळजळ होत असेल तर त्याचा थेट परिणाम पोटाच्या खालील भागात, कंबरेत आणि पाठीच्या दोन्ही बाजूंना होतो.
अनेकदा या दुखण्याला साधी पोटदुखी किंवा गॅस समजून दुर्लक्ष केले जाते मात्र त्यामुळे किडनीवर आणखी वाईट परिणाम होतो.
लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा लालसर होणे, किंवा लघवी फेसाळ होणे हे किडनीच्या समस्येची सुरूवातीची लक्षणे असू शकतात.
ज्यावेळेस किडनी शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर टाकण्यास अडथळा आणते. तेव्हा हे द्रव शरीरात साचून राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.