ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफीनमध्ये त्यांना आवडीचे पदार्थ देत असाल.
मात्र काही पदार्थ असे आहेत जे मुलांनी तुमच्याकडे कितीही हट्ट केला तरी तुम्ही ते त्यांच्या टिफीनमध्ये देऊ नका.
चला तर मग पाहूयात कोणते पदार्थ मुलांच्या टीफिनमध्ये देऊ नये.
हे इन्स्टंट असे तयार होणारे नूडल्स मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत शिवाय त्यामध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात.
बटाटा चिप्स तसेच बाजारात सहज मिळणारे फ्रेंच फ्राईज असे तळलेले पदार्थ मुलांच्या टिफीनमध्ये देऊ नका.
बाजारात अनेक पॅकेज केलेले स्नॅक्स मुलांच्या पसंतीचे असतात ज्यामुळे पालकांनी मुलांच्या टिफीनमध्ये हे देऊ नये.
मुलांना आवडणारे कँडी तसेच जेलीसारखे पदार्थ मुलांच्या टिफीनमध्ये देऊ नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.