Diwali 2025: दिवाळीमध्ये नातेवाईकांना 'या' गोष्टी भेट म्हणून देऊ नका

Surabhi Jayashree Jagdish

गिफ्ट निवडताना विचार करा

दिवाळीत गिफ्ट देणं हे प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचा सुंदर मार्ग असतो. पण जर दिलेलं गिफ्ट निरुपयोगी किंवा वापरात न येणारे असेल तर समोरच्या व्यक्तीचा मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे गिफ्ट निवडताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते.

शोपीस गिफ्ट

मार्केटमध्ये मिळणारे शोपीस पाहायला आकर्षक वाटतात. पण बहुतेक वेळा हे घरात फक्त जागा व्यापून ठेवतात आणि धूळ साचण्याचे कारण बनतात. अनेकजण असे शोपीस वापरण्याऐवजी पुढे दुसऱ्याला गिफ्ट करतात.

मिठाईचे गिफ्ट बॉक्स

खूप लोक मिठाईचे गिफ्ट बॉक्स देतात कारण ते पारंपरिक आणि सोपे वाटतात. पण दिवाळीत जवळजवळ प्रत्येक घरात आधीच भरपूर मिठाई असते. त्यामुळे हा गिफ्ट निरुपयोगी ठरतो आणि तोही बाजारात महाग दराने घ्यावा लागतो.

डेकोरेशन हॅम्पर्स

बाजारात तयार डेकोरेशन हॅम्पर्स सहज उपलब्ध असतात आणि ते दिसायला खूप सुंदर असतात. मात्र त्यांची क्वालिटी बहुतेक वेळा खूपच खराब असते आणि काही दिवसांत ते तुटून जातात. म्हणून शक्य असेल तर असे हॅम्पर्स गिफ्ट म्हणून देणे टाळावे.

कॅश किंवा युनिव्हर्सल गिफ्ट कार्ड

कॅश किंवा युनिव्हर्सल गिफ्ट कार्ड देणे अनेकांना सोयीस्कर पर्याय वाटतो. पण यामुळे गिफ्टमधला वैयक्तिक स्पर्श पूर्णपणे हरवतो. समोरची व्यक्ती असे गिफ्ट भावनाविरहित आणि निरस समजू शकते.

मग आणि फोटो फ्रेम्स

मग आणि फोटो फ्रेम्स हे सर्वात कॉमन गिफ्ट्सपैकी एक आहेत. बहुतेक लोकांच्या घरी आधीच अशा अनेक वस्तू पडलेल्या असतात. त्यामुळे असे गिफ्ट पाहून विशेष उत्साह किंवा आनंद वाटत नाही.

परफ्यूम किंवा स्किन प्रोडक्ट

परफ्यूम किंवा स्किन प्रोडक्ट देणे धोकादायक ठरू शकते. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि योग्य माहिती नसल्यास असे प्रोडक्ट त्यांना सूटच होणार नाहीत.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा