ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना दात घासल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते, परंतु यामुळे तुमचे दात खराब होऊ शकतात.
सकाळी किंवा रात्री दात घासल्यानंतर पाणी का पिऊ नये, यामागील कारण काय, जाणून घ्या.
यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ब्रश केल्यानंतर, टूथपेस्टमधून फ्लोराईडचा पातळ थर आपल्या दातांवर जमा होतो. हा थर बॅक्टेरियाशी लढतो आणि इनॅमल मजबूत करतो.
फ्लोराईडचे काम दातांना कॅव्हिटीपासून वाचवणे आणि इनॅमल खराब होण्यापासून रोखणे आहे, परंतु यासाठी ते काही काळ दातांवर राहणे आवश्यक आहे.
जर तुम्ही ब्रश केल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर हे फ्लोराईड लवकर निघून जाते. यामुळे, टूथपेस्टचा प्रभाव अपूर्ण राहतो आणि तुमचे दात कॅव्हिटीपासून पूर्णपणे सुरक्षित राहत नाहीत.
डेनटिस्टच्या मते, फ्लोराईडचा प्रभाव दिसण्यासाठी किमान १०-१५ मिनिटे लागतात, तरच ते इनॅमल मजबूत करू शकते. जर तुम्हाला निरोगी दात हवे असतील तर ब्रश केल्यानंतर काही वेळ थांबावे.
फक्त पाणीच नाही तर ब्रश केल्यानंतर लगेच चहा-कॉफी पिणे किंवा काहीही खाणे टाळावे. तुमच्या या एका सवयीने तुम्ही तुमचे दात दीर्घकाळ मजबूत आणि कॅव्हिटी फ्री ठेवू शकाल.