Saam Tv
हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्व असते.
तसेच त्यातील रविवार या दिवशी सुर्यदेवाला समर्पित केला जातो.
रविवारी सुर्यदेवाची पूजा केल्याने पैशाच्या समस्या, घरातल्या अडचणी, कामातल्या अडचणी दूर होतात असे मानले जाते.
या दिवशी अनेक लोक सुर्यदेवाची कृपा मिळावी म्हणून व्रत ठेवतात. मात्र काही चुका टाळल्या पाहिजेत नाहीतर व्रत कामी येत नाही.
रविवारच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल तर तुळशीला पाणी घालणे टाळा. त्याऐवजी सुर्याला अर्पण करा.
रविवारच्या दिवशी कोणत्याही धातुच्या वस्तू एकमेकांना देणे टाळा.
तुम्ही या दिवशी मसूर, उडीद, लाल पालक या पदार्थांचा समावेश करत असाल तर तुमचा सुर्य कमजोर होवू शकतो.