Manasvi Choudhary
आरोग्यासाठी लिंबू पाणी अत्यंत फायदेशीर मानले जात. लिंबू पाणी प्यायल्याने थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. मूड फ्रेश होतो.
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी एक ग्लास लिंबू पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते.
मात्र काहीजण लिंबू पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात जास्त साखर मिक्स करतात. ज्यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो.
लिंबू पाणी हे घराघरात होणारे पारंपारिक पेय आहे. लिंबू पाणी बनवाताना लिंबू, मीठ, आणि जीरे पावडर मिक्स करतात.
1) हे मिश्रण केवळ शरीराला थंडावाच देत नाही तर शरीराची इम्युनिटी देखील वाढवतात.
2) लिंबू मधील व्हिटॅमिन सी शरीराराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
3) अनेकजण सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पितात यामुळे आरोग्याची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मात्र अतिप्रमाणात लिंबूमध्ये साखर मिक्स केल्याने त्यालील पोषक तत्वे कमी होतात. साखर रक्तातील साखरेचे पातळीवर परिणाम करते. पचनक्रियेवर देखील परिणाम होतो.
लिंबू सरबतची चव वाढवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी त्यात मध, पुदिनाची पाने, काळे मीठ, भाजलेली जिरा पावडर आणि तुळशीची पाने मिक्स करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.