Morning habits: सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी केल्यास कॅन्सरचा धोका होईल कमी

Surabhi Jayashree Jagdish

सकाळच्या चांगल्या सवयी

सकाळच्या योग्य सवयी शरीरातील चयापचय, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती सुरळीत ठेवण्यास मदत करते. नियमित निरोगी सवयींमुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Healthy morning routine | saam tv

कॅन्सरचा धोका

रात्रभर झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. त्यामुळे सकाळी एक ते दोन ग्लास पाणी पिणं उपयुक्त ठरतं. पुरेसं पाणी प्यायल्याने पचनक्रिया, पेशींचं कार्य तसंच किडनी आणि यकृताची कार्यक्षमता चांगली राहण्यास मदत होते.

Healthy lifestyle | saam tv

सूर्यप्रकाशात चालणे

सकाळचा सूर्यप्रकाश शरीरातील Circadian Rhythm संतुलित ठेवण्यास आणि व्हिटॅमिन डीच्या निर्मितीस मदत करतो. चालणं, योग, स्ट्रेचिंग किंवा सायकलिंग यांसारखा हलका व्यायाम वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

Drink water in morning | saam tv

तंतुमय नाश्ता

सकाळच्या नाश्त्यात फळे, भाज्या, सुकामेवा, सिड्स आणि प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. अशा आहारामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत होते.

Vitamin D | saam tv

धूम्रपान आणि साखरयुक्त पेये टाळा

तंबाखूचं सेवन हे टाळता येण्याजोग्या कॅन्सरच्या प्रमुख कारणांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे सकाळपासूनच त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. रिकाम्या पोटी साखरयुक्त पॅकेज्ड ज्यूस किंवा जास्त साखर असलेली पेयं घेतल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.

Daily exercise | saam tv

तणाव कमी करणाऱ्या सवयी

दररोज सकाळी ५ ते १० मिनिटं ध्यान, दीर्घ श्वसन, प्रार्थना किंवा कृतज्ञतेचा सराव केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव कमी झाल्यास हार्मोन्सचं संतुलन, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Healthy breakfast | saam tv

एकाच सवयीने कॅन्सर टाळता येत नाही

सकाळच्या या सवयी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीचा भाग आहेत. मात्र त्यामुळे कॅन्सर होणार नाही असं नाही. तंबाखूपासून दूर राहणं, संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी वजन राखणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करणं तितकेच आवश्यक आहे.

Meditation benefits | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Gut health | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Silent heart attack symptoms
येथे क्लिक करा