Ruchika Jadhav
केंद्र सरकारकडून पाळीव कुत्र्यांच्या काही प्रजातींवर बंदी घालण्यात आली आहे.
भारतात सध्या विविध प्रजातीचे श्वान पाळले जातात.
यातील काही कुत्र्यांच्या जाती या फार आक्रमक असतात. त्या माणसांवर थेट हल्ला करतात.
त्यामुळे २३ प्रजातींच्या श्वानाची आयात करणे, पाळणे, त्याची विक्री आणि पैदास यावर बंदी घालण्यात आली आहे.
टोसा इनु या कुत्र्याची प्रजाती फार आक्रमक असते. त्यामुळे या यादीत टोसा इनु प्रजातीचे नाव पहिलेच आहे.
अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर या श्वानाची प्रजाती देखील बॅन करण्यात आलेत.
फिला ब्रासीलीरो या प्रजातीच्या श्वानावर केंद्र सरकारने बंदी आणखी आहे.
यासह मध्य एशियाई शेफर्ड डॉग, कोकेशियन शेफर्ड डॉग, टॉर्नजैक अशा एकूण २३ प्रजातींवर बंदी आहे.