ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वारंवार जुलाब, गॅस किंवा पोटदुखी होत असेल तर ते गंभीर पचनसंस्थेच्या त्रासाचे संकेत असू शकतात.
ही समस्या केवळ खाण्यापिण्यावर अवलंबून नसून कोणत्यातरी गंभीर अंतर्गत आजाराचे लक्षणही असू शकते. चला समजून घेऊया.
आयबीएस हा दीर्घकालीन विकार आहे, ज्यात पोटदुखी, गॅस, अतिसार किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे ताण आणि आहारामुळे होतात.
दूषित अन्नामुळे अन्न विषबाधा होते, ज्यामुळे उलट्या, अतिसार, पेटके होतात; वारंवारता गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
दूध पियाल्यानंतर पोट बिघडल्यास लैक्टोज असहिष्णुता कारणीभूत असू शकते, गॅस, दुखणे व अतिसार यासारखी लक्षणे दिसतात.
दूषित पाणी किंवा अन्नामुळे बॅक्टेरिया शरीरात जातात, जे आतड्यांना त्रास देतात आणि वारंवार पोटदुखी व अशक्तपणा निर्माण होतो.
या क्रॉनिक आजारांमध्ये आतड्यांमध्ये जळजळ होते, अतिसार, रक्तस्त्राव व वजन घट होते आणि दीर्घकालीन उपचार गरजेचे असतात.
पोटदुखी कायम राहिल्यास, वजन कमी होत असल्यास, विष्ठेत रक्त दिसल्यास किंवा भूक न लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.