Aloo Paratha: बटाट्याचं सारण भरताना पराठा फाटतो? 'ही' सोपी ट्रिक वापरून बनवा लुसलुशीत आलू पराठा

Surabhi Jayashree Jagdish

पराठा फाटण्यामागचं मुख्य कारण

सामान्यपणे बटाट्याचं सारण कणकेत भरल्यानंतर पराठा लाटताना तो फाटण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे पराठ्याचा आकार बिघडतो आणि तव्यावर भाजतानाही अडचण येते. मात्र एक सोपी ट्रीप वापरल्याने तुमचा पराठा न फाटता तयार होणार आहे.

Potato Paratha Recipe | saam tv

आवश्यक साहित्य तयार ठेवा

या रेसिपीसाठी 3 ते 4 उकडलेले बटाटे, 1 कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागते. पराठे भाजण्यासाठी तूप किंवा तेलही तयार ठेवा.

Easy Paratha Recipe | saam tv

कणीक मळण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम उकडलेले बटाटे किसून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. त्यात गव्हाचं पीठ, मीठ, चिली फ्लेक्स, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा.

Indian Breakfast | saam tv

कणीक झाकून ठेवा

मळलेली कणीक किमान 15 मिनिटं झाकून ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे कणीक व्यवस्थित सेट होतं. यामुळे पराठे लाटताना ते सहज लाटले जातात आणि तडे जाण्याची शक्यता कमी होते.

Paratha Tips | saam tv

पराठे लाटण्याची सोपी ट्रिक

कणकेचे छोटे-छोटे गोळे तयार करा आणि हलक्या हाताने पातळ पराठे लाटा. वेगळं सारण नसल्यामुळे पराठा फुटण्याचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे पराठा एकसारखा, नीट गोल आणि आकर्षक दिसतो.

Quick Recipe | saam tv

पराठा भाजण्याची योग्य पद्धत

गरम तव्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूंना तूप किंवा तेल लावा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजा. अशा प्रकारे तयार केलेला पराठा बाहेरून खमंग आणि आतून मऊ राहतो.

Paratha Making Tips | saam tv

सर्व्ह करा

गरमागरम रेशमी आलू पराठा दही, लोणचे, हिरवी चटणी किंवा लोणीसोबत सर्व्ह करा. ही पद्धत वापरल्यास पराठा फाटण्याची समस्या जवळपास पूर्णपणे टाळता येते. एकदा ही ट्रिक वापरून पाहिल्यास पुढे आलू पराठा बनवणं अधिक सोपं होतं.

Crispy Paratha | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

signs of heart blockage | saam tv
येथे क्लिक करा