Laptop infertility: लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम केल्यास येतं वंधत्व?

Surabhi Jayashree Jagdish

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम करताना आपण अनेकदा मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून असं केल्याने वंधत्व येतं अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मांडीवर लॅपटॉप ठेवल्यास काय होतं?

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्यामुळे वंधत्व येत, असा ठोस वैज्ञानिक पुरावा अजून मिळालेला नाही. मात्र लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे अंडकोषाचं तापमान वाढू शकते, जे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते.

उष्णतेचा परिणाम कसा होतो?

अंडकोष शरीराच्या बाहेर असतात कारण त्यांना शरीरापेक्षा थोडं कमी तापमान लागतx. लॅपटॉप मांडीवर ठेवला की त्या भागाचं तापमान वाढतं. हे वाढलेलं तापमान शुक्राणू निर्मितीवर परिणाम करू शकतं.

शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम

उष्णतेमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. त्यांच्या हालचालीची क्षमता (motility) कमी होण्याची शक्यता असते. काही वेळा शुक्राणूंच्या रचनेतही दोष निर्माण होऊ शकतात.

तापमान किती वाढतं?

संशोधनानुसार लॅपटॉप मांडीवर ठेवल्यावर काही मिनिटांतच अंडकोषाचे तापमान वाढायला सुरुवात होते. साधारण एका तासात ते २-३°C ने वाढू शकतं. इतकी वाढही शुक्राणूंवर नकारात्मक परिणाम करू शकते.

बसण्याची पद्धतही कारणीभूत

लॅपटॉप वापरताना पाय जवळ घेऊन बसल्यामुळे उष्णता अडकून राहते. ही स्थिती अंडकोष अधिक गरम करते. म्हणजे फक्त लॅपटॉपच नाही तर बसण्याची पद्धतही धोका वाढवते.

रेडिएशनचाही काही प्रमाणात प्रभाव

Wi-Fi किंवा लॅपटॉपमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनबाबतही संशोधन सुरू आहे. काही अभ्यासांमध्ये हे शुक्राणूंना नुकसान करू शकतं असं समोर आलं आहे. मात्र याबाबत अजून ठोस निष्कर्ष नाही.

संशोधन काय सांगतं?

काही मोठ्या अभ्यासांमध्ये लॅपटॉप वापर आणि वंधत्व यामध्ये थेट मजबूत संबंध दिसलेला नाही. मात्र सतत उष्णतेचा संपर्क असेल तर प्रजननक्षमतेवर थोडा परिणाम होऊ शकतो.

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा